(Marathi translation) Anmol Chadwa explains CAAसीएए(CAA)आणि एनआरसीबद्दल(NRC) जाणून घ्या, अंतर्भूत गोष्टी समजून घ्या. भारतातील गरीब-मुसलमान लोकसंख्येच्या गरीब लोकांना लक्ष्य करण्याचे हे सर्वात भयंकर कृत्य आहे.


* अनमोल चाडवा, सीएएचा(CAA) भारतीय मुस्लिम नागरिकांवर कसा परिणाम होईल हे स्पष्ट करतात.
* मी हा प्रश्न बर्‍याच वेळेस पाहत आहे, कदाचित निर्दोषपणे किंवा कदाचित लोकांना गोंधळात टाकण्यासाठी. याची पर्वा न करता, हा कायदा अमानुष आहे आणि आपल्या देशाला का फाडून टाकत आहे, हे मी अगदी सोप्या शब्दांत सांगू इच्छितो.

पहिली गोष्ट म्हणजे हे विधेयक (कॅब)(CAB) नाही तर संसदेच्या दोन्ही सभागृहांद्वारे हे संमत झाले आणि आता ते कायदा (सीएए) (CAA) आहे. तसेच, सीएए(CAA) एनआरसी(NRC)शिवाय निरुपयोगी आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला या दोन्ही कायद्यांना सोबत बघावं लागेल.

वस्तुस्थिती १: आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी जाहीर केले की, आसाममध्ये राबविण्यात आलेली एनआरसी (NRC) आता देशभरात आणली जाणार आहे. भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला लवकरच त्यांचे नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे.

वस्तुस्थिती 2: पॅन कार्ड किंवा आधार कार्ड, हे आपल्या नागरिकत्वाचा पुरावा नाही.

वस्तुस्थिती ३: देशभरात अटकेची केंद्रे बांधली जात आहेत.
हे एक निर्विवाद तथ्य आहे आणि ते पचवून घ्या.

आता एनआरसी सुरू झाल्यावर आसाममध्ये काय घडले ते पाहूया. हर्ष मंदर म्हणतात “नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी)(NRC)ने आसाममध्ये निर्माण केलेल्या भयानक द त्रासदी चा मी साक्षीदार झालो आहे. गरीब लोक, बहुदा भूमिहीन आणि पात्र न झालेले लोक, त्यांचे सर्व सामान साठवून ठेवत असतात आणि त्यांना कागदपत्रे ऐकत्र करायला आणि आपण नागरिक आहोत हे सिद्ध करायाला वर्षे निघून जाईल. जन्माची ही प्रमाणपत्रे, शालेय शिक्षण, जमीन-मालकी आणि अनेक दशकांपूर्वीच्या मतदार याद्या अशा आहेत की आपल्यातील बहुतेकांना एकत्र करणे अशक्य आहे. लेखनातील एक लहान विसंगतीसुद्धा या दस्तऐवजांना नाकारण्यासाठी पुरेशी आहे. “अशा चुकीचे दुष्परिणाम भयानक आहे. तुम्हाला वर्षानुवर्षे तुरुंगवास केंद्रात पाठविले जाऊ शकते. एनआरसीच्या यादीतून नावे गेले किंवा प्रियजनांना तुरुंगवास केंद्रात निर्वासित केले गेले यामुळें अनेकांनी निराशेने आत्महत्या केली.”

आसाममध्ये १९ लाख (१.९ दशलक्ष) लोकांना नागरिकत्व सिद्ध करता आले नाही. आत्ता, आपण जाती, पंथ आणि रंगात माणसांना वेगळं करत आहे, त्या लोकांपैकी एक तृतीयांश लोक मुसलमान असल्याचे आढळले.

यासाठी सीएए आणलेलं आहे , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केलेल्या देशव्यापी एनआरसीमध्ये आता मुस्लिम धर्मातील कोणत्याही व्यक्तीची ओळख न झाल्यास त्यांना शरणार्थी मानले जाईल आणि त्यांना नागरिकत्व दिले जाईल. केवळ कागदपत्र नसलेल्या मुस्लिमांनाच बेकायदेशीर स्थलांतरित केले जाईल, त्यांना कारागृहात नेले जाईल आणि सर्व नागरिकत्व हक्क म्हणजे मतदानाची हमी, जमीन मालकी आणि सामाजिक सुरक्षा यापासून दूर केले जाईल. हे आतापर्यंत फक्त आसामसाठी होते; आता हे सगळ देशव्यापी होणार आहे. आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास असमर्थ असलेल्या आपल्या देशातील सर्वात गरीब घटकांतील कोट्यावधी मुस्लिम लोकांना संपूर्ण भारतभर नजरकैदेत ठेवले जाईल.

तयार केलेली प्रक्रिया फनेल सारखी आहे. टॉप-ऑफ-द-फनेलवर (टोफू) आपण सगळे लोक आहोत.
मध्यभागी-फनेल (एमफू) मध्ये प्रत्येकजण त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यास अक्षम असणारे लोक आहे ( त्यांच्याकडे हे आवश्यक कागदपत्रे विकत घेण्याची ऐपत नाही) अगदी खालच्या भागाला (बीफु) फक्त मुस्लिम आहेत जे त्यांचे नागरिकत्व सिद्ध करू शकत नाहीत (आणि ते सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे विकत घेऊ शकत नाहीत).

टोफू ते एमफुकडे जाणे ही एक भयानक मोठी प्रक्रिया आहे, मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्ट कारभार होणार आहे. आपणास नोटाबंदी आठवते? जुगाड करणारे लोक स्कॉटमुक्त झाले आणि राजकारणी, मध्यमवर्गीय आणि काही भ्रष्ट बँकर्स श्रीमंत झाले. त्यापासून हे कसे वेगळे असेल? हे अमलात आणण्यासाठी भारताकडे पैसे आहेत का? कोणीतरी त्याची पाहणी केली आहे का? एखाद्याने खर्चाचा अंदाज लावला आहे का? निरर्थक, भाषिक, वक्तृत्ववादी विधानांखेरीज दुसर्‍याने कशाचेही नियोजन केले आहे का?

आणि नंतर, शेकडो हजारो कोटी रुपये खर्च झाल्यानंतर आणि आपल्यातील 1.3 अब्ज लोकांची तपासणी झाल्यावर, अंतिम रिपोर्ट कार्ड येईल, कोट्यवधी लोकांना फनेलच्या तळाशी सोडले जाईल, कारागृहात ताब्यात घेतले जाईल. त्या लोकांपैकी प्रत्येकजण मुस्लिम असेल, कारण या वाईट कायद्याची आखणीच तशी केली गेली आहे.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच देशातील एका विशिष्ट घटकाला उघडपणे लक्ष्य केले जात आहे. याचाच विद्यार्थी निषेध करीत आहेत. आयआयटी मद्रास, आयआयटी बॉम्बे आणि या देशातील बर्‍याच शैक्षणिक संस्थांमधील विद्ार्थ्यांना ब्रेनवाश केले जात आहे असे तुम्हाला वाटते का? त्यांना अधिक शक्ति मिळो, ते आघाडीवर आहेत, प्रोटेस्टद्वारे देशाचे नेतृत्व करत आहे!

हर्ष मंदर च्या शब्दाने मी शेवट करीन “हा अमानुष निर्णय आपल्याला, नाझी जर्मनी च्य इतिहासाची आठवण करून देतो. त्या काळातील आणखी एक आठवण म्हणजे ज्यू-यहुदी जर्मन लोकांची शांतता आणि उदासीनता. आजसुद्धा, संतप्त तरुण जर्मन त्यांच्या पालक आणि आजी-आजोबांना विचारतात “आपण गप्प कसे राहले ? प्रतिकार करण्यासाठी आपण काय केले?” दशकांनंतर, हेच प्रश्न आपल्याबद्दल नक्कीच विचारले जातील. आपल्या नंतरच्या पिढ्यांना आपण काय कोणती उत्तरे देणार? “

#CAA #NRC #WeAreAllInTheFunnelNow #SpAAAAness

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s